यावल : तालुक्यातील पिंप्री येथे यात्रेत झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून शुक्रवारी दोन कुटुंबात हाणामारी झाली. यात परस्पर फिर्याद दाखल करण्यात आली असून 15 जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने गावात मोठी खळबळ उडाली.
किरकोळ कारणावरून दोन गट भिडले
पिंप्री, ता.यावल येथील पुंडलिक गोबा सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते शुक्रवारी घराबाहेर बसले असताना त्या ठिकाणी गोकुळ चिंतामण सपकाळे, बंडू गोकुळ सपकाळे, सुकलाल प्रभाकर सपकाळे, छोटू रामा सपकाळे, सुनील मोतीराम सपकाळे, सोनू सुकलाल सपकाळे, निर्मलाबाई गोकुळ सपकाळे व रंजनाबाई सुकलाल सपकाळे (सर्व रा.पिंप्री, ता.यावल) हे सर्व आठ जण आले व तुझा मुलगा भास्कर हा यात्रेमध्ये सुकलाल सोबत भांडण करत होता असे सांगत वाद घातला व हातात कुर्हाड, विळा व लाठ्याकाठ्यांनी फिर्यादी व फिर्यादीची पत्नी, मुलगा व सून यांना मारहाण करून दुखापत केली या हाणामारीत फिर्यादी यांची सून यांच्या गळ्यातील सोन्याचे पोत तोडून टाकली. या फिर्यादीवरून सर्व आठ जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक जवरे करीत आहे
दुसर्या गटाचीही फिर्याद
दुसर्या गटातर्फे सुकदेव प्रभाकर सपकाळे (रा.पिंप्री) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार यात्रेत झालेल्या भांडणाचा जाब विचारण्यास गेले असता पुंडलिक गोबा सपकाळे, शोभाबाई पुंडलिक सपकाळे, भास्कर पुंडलिक सपकाळे, धर्मेंद्र पुडंलि सपकाळे, विजय पुंडलिक काळे, शोभा विजय सपकाळे व स्वाती भास्कर सपकाळे (सर्व रा.पिंप्री) यांनी कुर्हाडीच्या दांड्याने फिर्यादीचे नाकावर मारुन दुखापत केली तसेच फिर्यादीची पत्नी, मुलगा व चुलत भाऊ यांना सुध्दा मारहाण केली व गळ्यातील पोत तोडत नुकसान केले. या प्रकरणी संशयीतांविरोधात दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.