धुळे : शेतकरी आत्महत्या निर्मूलन व सहाय्यता समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत एकूण नऊ प्रस्ताव पात्र ठरले, तर तीन प्रस्तावाची फेरचौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हाधिकारी जलज शर्मा अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संग्राम पाटील, पंचायत समितीचे सभापती विजय पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे (शिरपूर), अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मनोजकुमार दास, तहसीलदार गायत्री सैंदाणे (धुळे ग्रामीण), सुनील सैंदाणे (शिंदखेडा), प्रवीण चव्हाणके (साक्री), अपर तहसीलदार संजय शिंदे (धुळे शहर), सुदाम महाजन (दोंडाईचा) यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. संबंधित तहसीलदारांनी चौकशी करुन सदरचे प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केले होते.
या बैठकीत एकूण 26 प्रस्ताव मांडण्यात आले होते. त्यापैकी नऊ प्रस्ताव मंजूर झाले. 14 प्रस्ताव अपात्र ठरले. तीन प्रस्ताव फेरचौकशीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. मंजूर प्रस्ताव असे : धुळे ग्रामीण- 04, साक्री- 01, शिंदखेडा- 01, शिरपूर- 01, अपर दोंडाईचा- 02