मीडिया एज्युकेटर्स असोसिएशनची बैठक उत्साहात

जनशक्ती न्युज – मीडिया एज्यूकेटर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मीम) या जनसंवाद आणि पत्रकारिता विषयाच्या प्राध्यापकांच्या राज्यस्तरीय संघटनेची प्रथम बैठक नुकतीच नाशिक येथे ऑफलाईन पध्दतीने घेण्यात आली. यापूर्वी कोराना महामारीमुळे सर्व बैठका ऑनलाईन झाल्या होत्या.

‘मीम’ संघटनेच्या पदाधिकारी आणि सर्व कार्यकारिणी सदस्यांची बैठक नुकतीच नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संघटना नोंदणी, संघटनावाढीसाठी प्रयत्न, माध्यम शिक्षणाबाबतचे प्रश्न, समस्या, अडचणी, ते सोडविण्यासाठी शासनस्तरावर करावयाचे प्रयत्न, अधिवेशन, परिषद, सेमिनार, कार्यशाळा घेण्याविषयी, माध्यम संशोधन पत्रिका, पुस्तके प्रकाशित करणे यावर चर्चा झाली. तसेच संघटना नोंदणीसाठी सर्व कागदपत्रे पूर्ण करण्याची कार्यवाही झाली. ही कागदपत्रे संघटना नोंदणीसाठी संबंधित शासकीय कार्यालयात दाखल केली जाणार आहेत.

यांची होती उपस्थिती 
या बैठकीला संघटनेचे राज्यस्तरीय अध्यक्ष प्रा.डॉ.सुधीर भटकर (विभागप्रमुख, जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग, कबचौउमवि, जळगाव) उपाध्यक्ष प्रा.डॉ.सुंदर राजदीप (विभागप्रमुख, जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई), सचिव प्रा.डॉ.विनोद निताळे (जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), सहसचिव प्रा.डॉ.शाहेद शेख (विभागप्रमुख, जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग, डॉ.रफिक झकेरिया हायर लर्निंग अॅण्ड रिसर्च सेंटर, औरंगाबाद), कोषाध्यक्ष प्रा.डॉ.रोहित कसबे (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक) त्याचबरोबर कार्यकारिणी सदस्य प्रा.डॉ.कुमार बोबडे (विभागप्रमुख, जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग, श्री.शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावती), प्रा.डॉ.संजय तांबट (जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे), प्रा.डॉ.शिवाजी जाधव (जनसंज्ञापन आणि वृत्तविद्या विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), प्रा.डॉ.मोईज हक (विभागप्रमुख, जनसंवाद विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ, नागपूर), प्रा.डॉ.सुहास पाठक (मीडिया स्टडीज् सेंटर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड), प्रा.डॉ.मीरा देसाई (एसएनडीटी विद्यापीठ, मुंबई), डॉ.मंजुला श्रीनिवास (एचएसएनसी विद्यापीठ, मुंबई) उपस्थित होते.