करीअर कट्ट्याचा”  स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा– प्राचार्य डॉ. व्ही. आय. गिरासे

    खापर – येथील संत जगनाडे महाराज शिक्षण मंडळाचे कला व वाणिज्य महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या द्वारे राबविण्यात येणाऱ्या करियर कट्ट्याच्या फलकाचे अनावरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. आय. गिरासे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. आय. गिरासे म्हणाले की , विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी करीअर कट्ट्यात सहभागी व्हावे. करीअर कट्ट्याच्या माध्यमातून आपला विकास कसा घडून आणता येतो ते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना संबोधित केले. सर्व विद्यार्थ्यांनी करीअर कट्ट्यात सहभागी होण्याचे आव्हान त्यांनी केले.
करीअर कट्ट्याचे समन्वयक डॉ. पी. बी. घंटे यांनी करीअर कट्ट्याचा हेतू काय आहे व करीअर कट्ट्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या आय.ए.एस. आपल्या भेटीला, उद्योजक आपल्या भेटीला, सायबर सेक़्युरीटी सेल, आवाजाची कार्यशाळा , संविधानाचे पारायण अशा  विविध उपक्रमाची माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे  करीअर कट्ट्याचे हेच प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन करीअर कट्ट्याचे समन्वयक डॉ. पी. बी. घंटे यांनी केले. कार्यक्रमास संस्थेचे सचिव व अधिक्षक नानासाहेब बी. सी. चौधरी यांनी  शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास डॉ. बी. एस. पाटील , डॉ. जी. पी. पाठक , प्रा एस. पी. बैसाणे , प्रा. डी. टी. सूर्यवंशी , प्रा. एन. एस. तडवी , प्रा. मिलिंद तुलसे , प्रा. तडवी अनिल व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. करीअर कट्ट्याचे विविध उपक्रम महाविद्यालयात वर्षभर मा. यशवंत शितोळे , अध्यक्ष महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र व करियर कट्टाचे जिल्हा समन्वयक डॉ. एम. जी. मोरे यांच्या मार्गदर्शनातून होणार आहेत.