भुसावळ सह जळगाव शहरावर कोरोनाचे सावट

जळगाव जिल्ह्यात आता कोरोना चे संकट दिवसेंदिवस वाढत असून भुसावळ आणि जळगाव तालुक्यात रोज कोरोनाचा आकडा वाढत आहे. गेल्या चोवीस तासात कोरोनाचे चे तब्बल 13 रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत ज्यातील 5 हे जळगाव शहरात तर 3 हे भुसावळ शहरात आढळले आहेत.

 

जिल्ह्यात आतापर्यंत 2579 रुग्णांना कोरोनामुळे मुळे आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 42 हजार 236 रुग्णांनी कोरोना वर यशस्वी बात केली आहे.