रस्ता अनुदानासाठी 16 कोटी रुपयांचा निधी

आ. किशोर पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

पाचोरा। पाचोरा-भडगाव विधानसभेअंतर्गत येणार्‍या विविध रस्त्यांच्या कामासाठी आ.किशोर पाटील यांच्या प्रयत्नातून तब्बल 16 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती आ.किशोर पाटील यांनी दिली. या सर्व रस्त्यांची मागणी स्थानिक जनतेने लावून धरली होती. त्याची दखल घेत आ.किशोर पाटील यांनी शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

रस्ते कामात पाचोरा तालुक्यातील सामनेर-दहिगाव दरम्यान साडेचार किलोमीटरच्या रस्ता दुरुस्तीसाठी अडीच कोटी रुपये, सारोळा-मोंढाळा दरम्यान असलेल्या सुमारे चार किलोमीटर रस्त्यासाठी अडीच कोटी, चिंचखेडा गाळण दरम्यान असलेल्या सुमारे दोन किलोमीटर रस्त्यासाठी एक कोटी रुपये, लासगाव-बांबरुड दरम्यान चार किलोमीटर रस्त्यासाठी अडीच कोटी रुपये तर भडगाव तालुक्यातील आर्वी शिरूड-पळासखेडे-भडगाव दरम्यान सुमारे नऊ किलोमीटर रस्त्यासाठी अडीच कोटी रुपये भडगाव वलवाडी रस्ता सुधारण्याकामी अडीच कोटी रुपये, कजगाव-पारोळा रस्ता सुधारणा करणे अडीच कोटी रुपये मंजूर झाले आहे. लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याने आनंद व्यक्त होत आहे. या कामांच्या मंजुरीबद्दल आ.किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पाणी पुरवठा व स्वच्छता तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.

रस्ते दुरुस्ती कामासाठी कायमच प्राधान्य राहिले आहे. मतदारसंघातील इतर नवीन व दुरुस्ती करावयाच्या रस्त्यांच्या कामासाठीही सतत पाठपुरावा सुरूच आहे.
आ.किशोर पाटील, पाचोरा-भडगाव मतदारसंघ