जळगाव – जिल्ह्यातील 11 मतदारसंघामधील अंतीम मतदारांची संख्या आज जाहीर करण्यात आली. यात जिल्ह्यात तब्बल 47 हजार 801 मतदारांची भर पडली आहे. जिल्ह्याची एकूण मतदारसंख्या 34 लाख 81 हजार 173 इतकी झाली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मतदार यादी पुर्नरिक्षण कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यानुसार दि. 1 नोव्हेंबर 2021 रोजी स्त्री, पुरूष आणि इतर अशी मतदारांची संख्या जाहीर करण्यात आली होती. यानंतर जिल्हा प्रशासनातर्फे नविन मतदार नोंदणीची मोहिम घेण्यात आली. या मोहिमेला नव मतदारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे जिल्ह्यातील मतदार संख्येत 47 हजार 801 नव मतदारांची भर पडली आहे. यात पुरूष 24 हजार 345, स्त्री 23 हजार 445 आणि इतर 11 मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्याची एकूण मतदारसंख्या 34 लाख 81 हजार 173 इतकी झाली आहे.
मतदारसंघनिहाय असे आहेत मतदार (अंतीम)
मतदारसंघ पुरूष स्त्री इतर
चोपडा – 163600 154762 04
रावेर 153280 142881 00
भुसावळ 162654 149094 27
जळगाव शहर 202459 182795 22
जळगाव ग्रामीण 162929 149934 02
अमळनेर 154636 143910 04
एरंडोल 146650 136959 02
चाळीसगाव 191292 170172 24
पाचोरा 164248 151074 02
जामनेर 161858 148380 06
मुक्ताईनगर 148758 138754 01
एकुण 1812364 1668715 94