भाजपचे नेते माजी मंत्री व जामनेरचे आमदार आ.गिरीश महाजन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जळगाव शहर मतदार संघाचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) हे आता होम क्वारंटाईन झाले आहेत. त्यांनी आपली कोरोना चाचणी केली होती त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, मात्र ते होम क्वारंटाईन झाले आहेत
जिल्ह्याचे नेते माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांचा कोरोना अहवाल दि.८ जानेवारी रोजी पॉझिटिव्ह आला होता. गुरुवार आणि शुक्रवारी आ.महाजन हे पक्षाच्या बैठकीला आणि विविध कार्यक्रमांना हजर असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन आ.महाजन यांनी केले होते. आ.राजूमामा भोळे यांनी देखील कोरोना चाचणी केली असता सुदैवाने त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.