जळगाव शहर महानगरपालिकेच्या महासभेत विकास कामांना सर्वपक्षीयमान्यता

अर्ध्यातासात सर्व विकास कामे मजूर , सर्व पक्ष साथ साथ

जळगाव – जळगाव शहर महानगरपालिकेची विशेष महासभा विकास कामांच्या मंजुरीसाठी सोमवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी जळगाव शहरातील विविध विकास कामांसाठी ४२ कोटी रुपयाच्या निविदांना  महासभेत मंजुरी देण्यात आली. शिवसेना, एम आय एम आणि भारतीय जनता पक्षाच्य सर्व नगरसेवकांनी एकमताने हे सर्व ठराव परीत केले.विशेष म्हणजे हि महासभा केवळ अर्ध्यातासात संपली.

ळगाव शहरातील विविध विकास कामांसाठी राज्य शासनाच्या १०० कोटीच्या निधीतुन 42 कोटींची कामे निश्चित करण्यात आली होती. शहरातील सर्व नगरसेवकांनी यावेळी या कामांना एकमताने मंजुरी दिली. जळगाव शहरात मुख्य समस्या ही रस्त्यांची असल्याने यावळी रस्त्याच्या कामाला प्राधान्य देण्यात आले.

येत्या काळात भारतीय जनता पक्षालाही विश्वासात घेणे – सुचिता हाडा
महासभे वेळी बोलताना भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सुचिता हाडा म्हणाल्या की, महासभेत ज्या ४२ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात येत आहे या सर्व कामांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. मात्र  कित्येक नगरसेवकांना यावेळी विश्वासात घेण्यात आले नव्हते. येत्या काळात ५८ कोटींच्या कामांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना देखील विश्वासात घ्यावे.यावेळी पुढच्या काळात सर्व नागरसेवाकांना विश्वासात घेण्यात येईल अशी ग्वाही यावेळी नितीन  नितीन लढ्ढा यांनी दिली.
आयुक्तांवर कोणाचा दबाव आहे का? – उज्वला बेंडाळे
मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यावर कोणाचा दबाव आहे का? असा प्रश्न यावेळी नगरसेविका उज्वला बेंडाळे यांनी उपस्थित केला. जळगाव शहरातील चर्च ते सुरेश नगर या रस्त्याची दुर्दशा झाली असून हा रस्ता जळगाव शहरातील मुख्य रस्ता आहे. स्वतः मनपा आयुक्त याठिकाणी स्पॉट व्हिजिटला आले असता त्यांनी हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त व्हावा असे मत व्यक्त केले होते. मात्र 42 कोटीचा निधी मध्ये हा रस्ता घेण्यात आला नसल्याने आयुक्त त्रिसदस्यीय समिती मध्ये दबावात आहेत का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर आयुक्तांनी उत्तर दिले कि, माझ्यावर कोणाचाच दबाव नसून येत्या ५८ कोटी रुपयांच्या कामांमध्ये हा रास्ता कामासाठी समाविष्ट करण्यात येणार आहे.
 
रिंग रोड वरील बंगल्यावर तात्पुरते महापौर निवास
जळगाव शहराच्या महापौरांना मनपाचे निवासस्थान उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव नगरसेवक नितीन लढ्ढा व आनंद जोशी यांनी  मांडला. रिंग रोड वरील मनपाच्या बंगल्यावर तात्पुरता महापौर निवास असेल असे यावेळी नगरसेवक नितीन लढ्ढा म्हणाले. सर्व पक्षीय सदस्यत्वाची महापौर निवास आला आपले समर्थन दर्शवले. यावेळी भाजपा नगरसेविका सुचिता हाडा म्हणाला की, येत्या काळात भारतीय जनता पक्षाचा महापौर महापालिकेवर बसणार असल्याने आम्ही या प्रस्तावाचे स्वागत करत आहोत.
या रस्त्यांच्या कामांना मिळाली मंजुरी

दूध फेडरेशन ते सिटी कॉलनीपर्यंतचा डीपी रोड
कालिका माता मंदिर ते जुना खेडी रस्ता
संभाजीनगर चौक ते मोहाडी रोड 
गणेश कॉलनी चौक ते कोर्ट चौक
 जिल्हा परिषद ते स्मशानभूमी
शिवाजीनगर उड्डाणपूल ते दूध फेडरेशन
चित्रा चौक ते बॉम्बे हार्डवेअर
 सायली हॉटेल ते स्टेडीयम कॉम्पलेक्स
बजरंग योगदा ते नवसाचा गणपती मंदिर
बजरंग बोगदा ते सुरत रेल्वेगेट 
शिवकॉलनी बाजार पट्टा ते विद्युत कॉलनी
एकलव्य क्रीडा संकूल ते कोल्हे नगर १०० फुटी रोड
काशिनाथ हॉटेल ते अशोक किराणा
चौबे शाळा,सुभाष चौक ते बेंडाळे चौक