येत्या काही महिन्यात सोन्यात भाव वाढ होणार ? 

 

 

जळगाव – येत्या काही महिन्यांमध्ये सोन्याचे भाव तब्बल ५५ हजार रु प्रति तोळे इतका वाढू शकतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यातच जळगाव शहराला सुवर्ण नागरी असं हि म्हटलं जात यामुळे सोन्याचे भाव वाढणार का ? आणि ते किती वाढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

२०२१ या वर्षात भारतीय बाजारावर परिणाम पाहायला मिळाला होता. वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सोन्याचे उच्चांक गाठला होता तर त्यानंतरच्या सहामाहीत सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. २०२२ मध्ये सोने ५५ हजारांच्या पातळीपुढे जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

तज्ज्ञांच्या मते मागील वर्षात शेअर बाजाराने चांगली कामगिरी केली. त्यामुळे भांडवली गुंतवणुकीकडे बाजार आकर्षित झाला. परिणामी दुसऱ्या सहामाहीत सोन्याच्या मागणीत काहीशी घट दिसून आली. अमेरिकेतही ओमिक्रॉनचे संकट पाहता नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचे आवाहन केले जात आहे. अशा स्थितीत अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने दरकपात केल्यास डॉलरचे महत्त्व वाढणार आहे. तरीही सोन्याकडे गुंतवणूकदार वळू शकतील. कारण जगभरात चलनवाढीचा धोका निर्माण झाल्याने लोक सोन्यात पैसा गुंतवून तो सुरक्षित करण्यावर भर देत असतात. शेअर बाजारातील चढउतार व राजकीय अस्थिरता आल्यासदेखील सोन्याचे भाव वाढू शकतात.

 

या बाबत बोलताना आर सी बाफना ज्वेलर्सचे माहिती अधिकारी मनोहर पाटील म्हणाले कि, सोन्याची भाव  वाढ होईल कि नाही ? हे मीच काय तर कोणीच सांगू शकत नाही. कारण त्या मागे खूप पैलू असतात. सध्य स्थितीत सोन्याचे भाव ४८ हजारांनावर स्थिर आहेत. येत्या काळात काय होईल हे येणारा काळच सांगेल.