मनपाकडून शहरातील डॉक्टर्स,हॉस्पिटलधारकांना सापत्नभावाची वागणूक
डॉ राधेश्याम चौधरी यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केले सवाल
यावेळी ते म्हणाले कि , अग्निशमन सेवेसाठी ४ वेगवेगळ्या नावांनी कर, निधी जळगाव मनपाद्वारे दवाखान्यांना आकारला जातो. एकाच प्रकारच्या सेवेसाठी ४ नावांनी निधी ,कर आकारणे नियम व कायद्याला धरून वाटत नाही. याबाबबतीत गेली ७-८ वर्षे आयएमए जळगाव मनपा प्रशासन व पदाधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा करत आहे. परंतु मनपा प्रशासन ठोस पावले न उचलता आश्वासन देवून वेळ मारून नेत असते.