७४ वर्षानंतर भेटले दोन ‘भाऊ’

१९४७ मध्ये भारत-पाकिस्तान फाळणीवेळी अनेक कुटुंब विखुरली गेली. त्यातीलच एक मोहम्मद सिद्दिकी. सिद्दिकी यांचे भाऊ हबीब उर्फ शेला फाळणीनंतर भारतातच राहिले. आता ७४ वर्षानंतर करतारपूर कॉरिडोर, जे पाकिस्तानातील गुरुद्वारा दरबार साहिब आणि भारत यांना जोडतं, त्याने दोन्ही भावांना पुन्हा एकत्र आणलं आहे. सध्या सोशल मीडियावर दोन्ही भावांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.