मुंबई – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सुचने नुसार मंत्रालयाच्या समोर असणार्या मंत्र्यांच्या बंगल्यांना गड-किल्ल्यांची नावे देण्यात आली आहेत. यात मंत्री उदय सामंत यांचा बंगला आता रत्नसिंधू या नावावे ओळखला जाणार असून मंत्री आदित्य ठाकरे यांच्या बंगल्याला रायगड या नावाने संबोधले जाणार आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या संदर्भात निर्देश जारी केले आहेत. यानुसार राज्य मंत्रीमंडळातील सर्व मंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या बंगल्यांना आता गड आणि किल्यांची नावं देण्यात येणार आहे.
नविन नाव अशी असतील –
अ-३ शिवगड
अ-४ राजगड
अ-५ प्रतापगड
अ-६ रायगड
अ-९ लोहगड
ब-१ सिंहगड
ब-२ रत्नसिंधू
ब-३ जंजिरा
ब-४ पावनगड
ब-५ विजयदूर्ग
ब-६ सिध्दगड
ब-७ पन्हाळगड
क-१ सुवर्णगड
क-२ ब्रम्हागिरी
क-३ पुरंदर
क-४ शिवालय
क-५ अजिंक्यतारा
क-६ प्रचितगड
क-७ जयगड
क-८ विशाळगड