शहरातील इदगाह कॉम्प्लेक्समधील हॉटेलातून तरुणाचा मोबाईल लंपास झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवार, 15 जानेवारी रोजी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. नशिराबाद येथील शाहरुख सिकंदर खान वय 28 या तरुणाचा हॉटेलचा व्यवयाय आहे नेहमीप्रमाणे तो 14 जानेवारी रोजी ईदगाह कॉम्प्लेक्समधील हॉटेलात असतांना कुणीतरी यांचा 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरुन नेला. सर्वत्र शोध घेवूनही मोबाईल मिळून आला नाही. अखेर चोरीची खात्री झाल्यावर शाहरुख खान यांनी शनिवारी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुदस्सर काझी करीत आहेत.