पवार आता फडणवीसांना ‘काशीचा घाट’ दाखवतील

मुंबई: भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनीही फडणवीसांना लक्ष्य केले आहे. फडणवीस यांना याआधीही शरद पवार यांनी कात्रजचा घाट दाखवला होता, आताही ते बोलत राहिले तर, पवार त्यांना काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला.

शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा साडेतीन जिल्ह्यांपुरताच मर्यादित असलेला पक्ष असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. फडणवीसांच्या या विधानानंतर अजित पवार यांनी फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांना नवाब मलिक यांनी टोला लगावला आहे. शरद पवार यांनी याआधी फडणवीस यांना ‘कात्रजचा घाट’ दाखवला आहे. आता तर पवार हे फडणवीसांना ‘काशीचा घाट’ दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असं मलिक म्हणाले.