जळगाव – शहरातील रस्त्यांच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्याचे मार्गावर आहे, अश्यावेळी विविध चौकात होत असलेल्या सर्कलला नाव देण्यासाठी नवीन वाद सुरु झाला आहे. आजिंठा चौफुलीवरील सर्कलला नाव देण्यावरून वाद सुरु झाला आहे. यावेळी महाविकास आघाडी कडून सरदार वल्लभभाई पटेल हे नाव तर स्थानिक रहिवाशांकडून स्वातंत्र्य सेनानी मीर शुक्रुल्ला हे नाव द्यावे अशी मागणी होत आहे.
आज सकाळी महाविकास आघाडीकडून लोहपुरुष सरदार वलभभाई पटेल सर्कल असे नाव तर मीर नाजीम अली यांच्याकडून त्यांचे आजोबा खानदेश गांधी स्वातंत्र्य सेनानी मीर शुक्रुल्ला सर्कल असे फलक लावण्यात आले. दोन्ही बाजूच्या समर्थकांनी गर्दी केली त्यामुळे प्रकरण तापून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वेळीच पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी येऊन मध्यस्थी करावी लागली. पोलिसांकडून दोघीही फलक काढण्यात आले व गर्दी पांगवत शांतता प्रस्थिपित करण्याचे आवाहन करण्यात आले.
महाविकास आघाडीचा सरदार पटेल यांच्या नावासाठी आग्रह असून या मागणीचे निवेदन अगोदरच मनपा प्रशासनाला देण्यात आले आहे .असे सांगत कुठलाही वाद निर्माण न होता पटेल यांचेच नाव सर्कलला देण्यात यावे अशी मागणी नगविकास आघाडीच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी केली. या वेळी राष्ट्रवादीचे अशोक लाडवंजारी,काँग्रेसचे शाम तायडे, यांचे सह.पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील रहिवाशी उपस्थित होते.