शहराच्या सर्वांगिक विकासासाठी ७ नगरसेवकांनी घेतला पुढाकार

जळगाव – शहर महापालिकेच्या ७ नागरसेवकांनी आपल्या प्रभागाला मिळणारा निधी इतर प्रभागांना वर्ग केला आहे. जळगाव शहराच्या इतर भागातल्या रस्त्यांचा विकास व्हावा यासाठी सत्ताधारी शिवसेनेच्या ७ नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे.

जळगाव शहरातील प्रमुख बाजारपेठेतील रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. याचबरोबर प्रमुख रस्त्यांचे कामे सुरु झाली आहेत. मात्र जळगाव शहराचा सर्वांगिक विकास व्हावा यासाठी जळगाव शहरातील ७ नागरसेवकाकांनी या पुढाकार घेतला आहे. प्रभाग क्रमांक ५ मधील ४ , प्रभाग क्रमांक १२ मधील १ तर प्रभाग क्रमांक १५ मधील २ नगरसेवकांचा समावेश आहे. येत्या महासभेत ५८ कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा महासभेत  समोर ठेवण्यात येणार आहेत.ज्या मध्ये प्रत्येका नागसेवकांना ५० लाख रुपयांचे प्रस्ताव मागवण्यात आले होते. सर्व नागरसेवकांनी आपले प्रस्ताव पाठवले आहेत. शिवनेच्या ७ नागसेवकांनी शहराच्या  सार्वांगिक विकासासाठी आपले प्रस्ताव सादर न करता इतर प्रभागांना आपला निधी दिला आहे. अश्या प्रकारे एकूण ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी इतर इतर प्रभागाच्या विकासासाठी वर्ग करण्यात आला आहे.

 

या ७ नगरसेवकांनी घेतला पुढाकार 

महापौर जयश्री महाजन , विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, नितीन लद्धा , विष्णू भंगाळे, ज्योती तायडे, नितीन बर्डे, राखी सोनावणे

संपूर्ण विकास व्हावा – नितीन लड्ढा

जळगाव शहराचा संपूर्ण विकास व्हावा या अनुशंघाने हा निर्णय घालण्यात आला आहे. ज्या भागाचा अजून विकास झाला नाहीये त्या भागात हा निधी वापरला जाणार आहे.