२६ जानेवारी पासून रेल्वे माल धक्का माथाडी कामगार संघटनेचे आमरण उपोषण

जळगाव रेल्वे माल धक्का माथाडी कामगार संघटना जळगाव जिल्हा यांनी २६ जानेवारी पासून आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. कामगारांना न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरु राहणार आहे.

महाराष्ट्र माथाडी कामगार अधिनियम 1969 व जळगाव जिल्हा माथाडी व संरक्षण कामगार मंडळाची योजना 1992 च्या तरतुदीनुसार रेल्वे मालधक्का येथे हमाल माथाडी कामगारांचे दैनंदिन कामाचे मजुरी दर हे प्रशासनाने निर्धारित केलेले आहेत. मात्र  निश्चित केलेल्या दर प्रशासन अमलात आणत नसून मागील वर्षीचे दर 66 रुपये प्रति टन निश्चित केलेल्या असतानासुद्धा रुपये ५५ प्रति टन कामगारांना देण्यात येत होते.

जानेवारीमध्ये असंरक्षित कामगार मंडळाची योजना 1992 निर्देशांकानुसार दरात दहा टक्के वाढ करणे अपेक्षित असताना प्रशासनाने फक्त पाच टक्के दरवाढ केली माथाडी कामगारांवर अन्याय कारक असल्यामुळे तसेच मागील वर्षाचा थकीत दरवाढ रक्कम कामगारांना न मिळाल्यामुळे जळगाव जिल्हा माथाडी कामगार संघटनेमार्फत माननीय सहाय्यक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष जळगाव माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ जळगाव यांना  आमरण उपोषणाची घोषणाची नोटीस पाठवली आहे. शासनाच्या धोरणा विरुध्द माथाडी कामगारांनी तीव्र निषेध आपल्या सह्यानिशी माथाडी कामगार संघटने कडे नोंदविला असून त्यास माथाडी कामगार संघटनेने सर्वानुमते समर्थन/ पाठींबा दर्शविलेला आहे.