घृणास्पद ! जळगावात मामाने केले भाचीवर आत्यावर

जळगाव : नशिराबात परिसरात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यात २२ वर्षीय मामाने आपल्या ४ वर्षीय भाचीवर अत्याचार केला आहे.  नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मामा पसार झाला आहे.

नशिराबाद परीसरातील एका भागात आलेल्या कुटुंबातील चार वर्षीय बालिकेवर नात्यानेच चुलत मामा लागणाऱ्या नराधम 22 वर्षीय आरोपीने अत्याचार केला. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका गावात राहणाऱ्या चार वर्षीय चिमुकली आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. १४ जानेवारी रोजी दुपारी चिमुकली ही घरी एकटी असतांना संशयित आरोपीने खेळण्याच्या बहाण्याने बोलवून एकांतात तिच्यावर अमानुष अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंके करीत आहे.