उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीसांचा शहर पोलिस ठाण्यात गौरव

शिरपूर(प्रतिनिधी) शहर पोलीस ठाण्यातील पोलीसांचे कामाचा दर्जा उंचाविण्यासाठी दर महिन्यातील उत्कृष्ट कामगीरी करणारे पोलीस अंमलदार यांचा गुणगौरव व उत्कृष्ट कामगोरी करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या संकल्पनेतून प्रजासत्ताक दिनानिमित्ताने शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार व कर्मचाऱ्यांचा  उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या हस्ते व  पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
         जिल्हा पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाटील यांचे संकल्पनेतून शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी प्रलंबित गुन्ह्याची तात्काळ नियंती करणे. मालाविरु उघडकीस आणणे.फरार व पाहिजे असलेले आरोपी पकडणे तसेच दोषसिध्दीसाठी कुशल तपास करून करून उत्कृष्ट कामगीरी अशी सोपविलेली जबाबदारी अतिशय प्रमाणिकपणे व श्रमान उत्कृष्ट पाडले अशांना रोख पारितोषिक प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करून त्यांचा गुणगौरव करण्यात येत आहे.त्यानंतर्गत शहर पोलीस ठाण्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त
प्रथम पारितोषिक पोहेकॉ नारायण मालचे यांना देऊन सत्कार करण्यात आला.तसेच शहर पोलीस ठाण्यातील विशेष कामगिरी करणारे पो.उ.नि. संदिप असई नारायण पाटील, रामकृष्ण मोरे, पोहेको लादुराम चौधरी, ललित पाटील, पाना तुकाराम भरत चव्हाण, हेमंत पाटील, पोकॉ गोविंद कोळी. विनोद आखडमल, प्रविण गोसावि, मनोज अनिल अहिर व भपोको स्वाती शहा आदींना बक्षीस देवून त्यांचा गुणगारव करण्यात आली.
       कार्यक्रमावेळी पोलीस अंमलदार यांनी मनोगत व्यक्त केले.धुळे जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाटील,अपर पोलीस अधिक्षकप्रशांत बच्छाव व उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने तसच पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी रविंद्र देशमुख यांनी गौरविण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे अभिनंदन केले