एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी मार्ग काढुन संप मिटवावा – प्रफुल्ल लोढा

जामनेर – गेल्या तीन-चार महिन्यांपासून कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन सुरू केले असून ते त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. शासनही त्यांच्या निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे संप मिटण्याचे अजूनही कुठली चिन्हे दिसत नसून कर्मचाऱ्यांनी संपाबाबत तडजोडीचा मार्ग स्वीकारून संप मिटवावा. आपल्या पगारवाढीच्या संदर्भात काही मागण्या असतील त्यासाठी मी पुढाकार घेऊन आपल्या मागण्या शासन दरबारी मांडून योग्य तो मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करू म्हणाल त्या मंत्र्याकडे आपण जाऊ मात्र  आपली तडजोड करण्याची मानसिकता झाली पाहिजे अशा भावना  येथील सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल कुमार लोढा यांनी व्यक्त केल्या.
 प्रफुल्लकुमार लोढा यांच्या वाढदिवसानिमित्त एसटी कर्मचाऱ्यांनी आयोजित एका सत्कार समारंभात  ते बोलत होते. यावेळी प्रफुल्ल लोढा यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे राशन किट देऊन त्यांना मदतीचा हात दिला याचबरोबर शहरातील गांधी चौक मेन रोड वर त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना कोरोना पासून बचाव व्हावा म्हणून मास्क चे वितरणही केले .
प्रफुल्लकुमार लोढा पुढे म्हणाले की शासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शासन कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे  कोर्टाने विलीनीकरणाचा आदेश दिल्यास विलीनीकरण केले जाईल अशी स्पष्ट भूमिका शासनाने मांडली आहे. परंतु कोर्ट निर्णय कधी देईल याबाबत अनिश्चितता आहे.  एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणा शिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही याच मागणीवर ठाम आहात. त्यामुळे हा तिढा कसा सुटेल असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संपामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शासनही परेशान आहे. याच बरोबर जनता ही आता त्रस्त झाली आहे. अवैध वाहतूक तून प्रवास करावा लागत असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर लूट होत आहे . अवैध प्रवासी वाहतूक धारकअव्वाच्या सव्वा भाडे आकारून नागरिकांची लूट करीत आहेत. कर्मचाऱ्यांचे ही पगार बंद असल्याने त्यांच्या कुटुंबावर व त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. अनेकांची परिस्थिती जेमतेम असल्याने कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवावा असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या हालअपेष्टा सुरू आहे. हा त्यांच्या व त्यांच्या मुलाबाळांचा आयुष्याचा प्रश्न आहे. म्हणून राजकारण बाजूला ठेवून आपण सर्वांनी माणुसकीच्या दृष्टीकोनातून बघण्याची आता गरज आहे. असे सांगून लोभाजी पुढे म्हणाले की आपणही एक पाऊल मागे येऊन विलीनीकरणाचा  प्रश्‍न कोर्टाचा निर्णय आल्यावर होईल. तो मान्य करून आपले पगारवाढीचा संदर्भात काही मागणी असेल तर ती मागणी आपण घेऊन शासनाकडे जाऊ .वाटेल त्या मंत्र्यांना भेटू .मी आपल्या सोबत आहे. योग्य काय ते तडजोडीचा मार्ग स्वीकारून संप मिटवावा असे आवाहन प्रफुल्ल लोढा यांनी केले.