दिलासादायक ! राज्यात १%हून कमी रुग्ण व्हँटीलेटरवर 

मुंबई – राज्यात  मुंबई, ठाणे, पालघर या भागात रुग्णवाढीचा ट्रेंड होता पन तो आता कमी झाला आहे. याच बरोबर पुणे, नागपूर, नाशिक, औरंगबाद इथली रुग्णसंख्या वाढत आहे. यात दिलासायक बाब म्हंणजे ५ टक्क्यांच्या वर बेड ऑक्युपन्सी नाही याचबरोबर  आयसीयू आणि व्हेंटिलेटरवरचे रुग्ण १ टक्क्यांहूनही कमी आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत राजेश टोपे यांनी केली.

दररोज रुग्ण बरं होण्याचं प्रमाण हे रुग्ण बाधित आढळण्याच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. त्यामुळे आता आपल्याला कोविडबरोबर जगावं लागेल, अशा संकल्पनेतून आपल्याला पुढची वाटचाल करावी लागेल. हे आपल्याला पाश्चिमात्य देशांमध्ये रुग्णसंख्या वाढत असतानाही निर्बंध कमी केल्यातून दिसत आहे. केंद्र शासन, ICMR, टास्क फोर्सने आम्हाला मार्गदर्शन केलं तर आम्हालाही कोविडबरोबर कसं जगता येईल याबद्दल लोकांना मार्गदर्शन आणि प्रबोधन करता येईल’