शहरातील २१० हौसिंग सोसायट्या झाल्या कचरामुक्त

जळगाव – स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरामुक्त शहरांचे रेटिंग जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर अयोग्य विभागाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त पवन पाटील यांनी  जळगाव शहरातील नागरिकांसाठी कचरामुक्त सोसायटी अभियान सुरु केले होते. या मोहिमेला प्रतिसाद देत शहरातील २१० हौसिंग सोसायट्या कचरामुक्त घोषित करण्यात आल्या आहेत.

स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२१ अंतर्गत देशभरातील शहरांचे घनकचरा व्यवस्थापन, कचऱ्याचे विलगीकरण, कचऱ्याचे संकलन व हगणदारीमुक्तीची स्थिती या आधारावर सहा हजार गुणांच्या सर्वेक्षणाची मोहीम केंद्र शासनाकडून घेण्यात आले होते. याआधीच जळगाव शहर हगणदारीमुक्त शहर म्हणून जाहीर झाले होते. २०२० मध्येदेखील जळगाव शहराने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तीन स्टार मिळवले होते. २०२१मध्ये देखील जळगाव शहराला तीन स्टारच मिळाले होते.याच पार्श्वभूमीवर जळगाव शहरात कचरामुक्त सोसायटी अभियान सुरु करण्यात आले होते.  यात शहरातील २१० हौसिंग सोसायट्या या कचरामुक्त घोषित करण्यात आल्या आहेत.