जळगाव विभागातील ३ हजाराहुन अधिक कर्मचारी अजूनही संपावर ठाम.

जळगाव – एसटी परिवहन महामंडळ विभागात कर्मर्चायांचे ७ नोव्हेंबरपासून संप सुरू आहे. या संपला ४ महिने पूर्ण होतील. जळगाव विभागात संप सुरू होण्यापूर्वी ४४४२ कर्मचारी हजेरीपटावर होते.त्यापैकी आतापर्यंत सुमारे ४०२ कर्मर्चायांचे निलंबन , ८६ जणांची सेवासमाप्ती, ३९ कर्मर्चायांच्या प्रशासकीय बदल्या तर  २०९ कर्मर्चायांना नोटीस  देण्यात आल्या आहेत. अश्या वेळी ३हजाराहुन अधिक कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहेत.

आतापर्यंत परिवहन मंत्री, कामगार संघटना, पदाधिर्कायांच्या मध्यस्थीनंतर संप पुकारर्णाया २० ते २२ संघटनांनी संपातून माघार घेतली आहे. असे असले तरी बहुतांश सुर कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्यावर ठाम आहेत असे चित्र पाहायला मिळत आहे. 

 

शासनात विलिनीकरण करून एसटीच्या कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा द्यावा, संसर्ग वा अन्य कारणांमुळे मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी मदतीसाठी अजूनही शासनस्तरावरून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, तसेच अन्य न्याय्य मागण्यांसाठी  गेल्या ७८ ते ८० दिवसांपासून एसटी कर्मर्चायांचा लढा सुरू आहे. आतापर्यंत प्रशा कर्मचाऱ्यांवर न बडतर्फीसह जणांची सेवासमाप्तीची कारवाईकरण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पुकारण्यात आलेल्या संपाचा तिढा अद्यापही सुटत नसल्याने सर्वसामान्य प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल होत असून सार्वजनिक वाहतूकीचा बोजवारा उडाला आहे.यामुळे जळगाव विभागाचे ७० कोटी रुपयांच्यावर उत्पन्न बुडीत झाले आहे. 

 

बसेसचे दगडफेकीत नुकसान

गेल्या ७८ दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे प्रत्येकी ७५ ते ८० लाख रुपये प्रतिदिन असे ७८ दिवसांचे ७० कोटींच्यावर रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. तसेच आतापर्यंत समाजकंटकांकडून विविध मार्गावर १५ बसेसचे दगडफेकीमुळे नुकसान झाले आहे. यात तीन ते चार चालक किरकोळ तसेच गंभीर जखमी देखिल झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा तिढा सुटत नसल्यामुळे पूर्ण क्षमतेने बसेस अजूनही धावत नसल्याने शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थी व प्रवाशांचे हाल होत आहे.