जळगाव – जिल्हाधिकारी कार्यालया समोर विविध संघटनांनी व पक्षांनी सोमवारी मोठे आंदोलन केले. यामुळे सोमवार आंदोलनवार ठरला. वंचित बहुजन आघाडी , स्वराज्य कोळी समाज संघटना व विद्यार्त्यांनी सोमवारी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले.
दारू विक्रीसाठी दिलेली परवानगी मागे घ्यावी
राज्य शासनाने किराणा दुकानात वाईन दारू विक्रीसाठी दिलेली परवानगी मागे घ्यावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आले.
या निवेदनावर रिपाइंचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, जिल्हा सचिव भरत मोरे, युवक अध्यक्ष मिलींद सोनवणे, उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, कार्याध्यक्ष सागर सपकाळे, अक्षय मेघे, किरण अडकमोल, अनिल लोंढे, भिमराव सोनवणे, संदीप तायडे, विशाल महाले, लताबाई सोनवणे, शुभांगी भांडारकर, जनाबाई तायडे, वत्सलाबाई आगळे, रजूबाई सुरवाडे, लिलाबाई सोनवणे, शोभा सोनवणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
नागरीकांना तात्काळ घरकुल किंवा पर्यायी जागा देण्यात यावी
तांबापूरा परिसरात मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने नुकतेच अतिक्रण निर्मूलन केले होते. या नागरीकांना तात्काळ घरकुल किंवा पर्यायी जागा देण्यात यावी अशी मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील तांबापूरा परिसरातील महादेव मंदीर ते शिरसोली नाका परिसरात गेल्या ५० वर्षांपासून तेथील नागरीक वास्तव्याला आहे. नियमाप्रमाणे महापालिकेस घरपट्टी व पाणीपट्टी कर भरत आहे. येथील सर्व नागरीक हातमजूरी करून उदरनिर्वाह करतात. गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी परिसरात येवून रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली जेसीबीच्या मदतीने घरे तोडण्यात येत आहे. त्यामुळे येथील नागरीकांना राहण्याची जागा शिल्लक राहत नाही. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेत महादेव मंदीर ते शिरसोली नाक्यापर्यंतच्या नागरीकांना घरकुल किंवा पर्यायी जागा देण्यात यावी. येत्या दोन दिवसात पर्यायी जागा मिळाली नाही तर गुरूवार ३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल.
या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, जिल्हा महासचिव वैभव शिरतूरे, जिल्हा उपाध्यक्ष डिगंबर सोनवणे, महानगरप्रमुख दिपक राठोड, महानगर सचिव डॉ. नारायण अटकोरे, महानगर उपाध्यक्ष मनोज अडकमोल, जितेंद्र केदारे, गमीर शेख, संजय शिंदे, प्रविण इंगळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
नराधमांना कठोरात कठोर शिक्षा करावी
जळगाव । यावल तालुक्यातील आदीवासी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी स्वराज्य कोळी समाज संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. व विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले.
कोळी समाज बांधवांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय मुलगी आपल्या नातेवाईक व कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार २६ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही शौचालयासाठी गावातील रोडवर एकटी गेली होती. त्यावेळी गावातील दोन अल्पवयीन मुले व एका तरूण यांनी अल्पवयीन मुलीचे तोंड दाबुन शेजारच्या शेतात ओढून नेले व तिच्यावर सामुहिक अत्याचार केला. या घटनेतील तीनही संशयित आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी यासाठी खटला फास्ट कोर्टात मार्फत विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, संशयितांना कठोरात कठोर शिक्षा झाली नाही तर कोळी समाज बांधव आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर अध्यक्ष विजय मोरे, मोहन सोनवणे, आकाश सपकाळे, स्वप्नील साळुंखे, भागवत कोळी, लखन कोळी, दत्तात्रय कोळी, पंकज सोनवणे ललित कोळी, महेंद्र सपकाळे, गजानन कोळी, संदीप कोळी, दिनेश वाघ, सावन कोळी, महेश कोळी, पिंटू जोहरे, संतोष कोळी, प्रकाश बोरसे, ॲड. गणेश सोनवणे, समाधान मोरे, विजय सोनवणे, सुभाष सोनवणे, कैलास सपकाळे, भगवान कोळी, किशोर बाविस्कर, सुनिल ठाकरे, रविंद्र कोळी यांच्यासह कोळी समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.