नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन काही वेळ्यातच देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहे.केंद्रीय अर्थमंत्री म्हणून निर्मला सितारामन यांचा हा चौथा अर्थसंकल्प असणार आहे. यावेळी बोलताना सीतारामन यांनी सांगितले कि ,नागरिकांची आर्थिक स्थिती कशी सुधारेल यासाठी सरकार प्रयत्नशील राहणार आहे. याच बरोबर लसीकरणाचा कार्यक्रम राबवला असून आरोग्यावर भर दिला. आत्मनिर्भर भारताला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, देशाचा विकासदर ९.२ टक्के राहण्याचा अंदाज आहे.
संसदेत अर्थसंकल्प सादर करण्याआधी तो केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाने अर्थ संकल्पाला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे संसदेत दाखल झाले आहेत.
संसदेत अर्थसंकल्प सादर करण्याआधी तो केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाने अर्थ संकल्पाला मंजुरी दिली आहे.
Delhi: Defence Minister Rajnath Singh, Union Home Minister Amit Shah, Railways, Communications and IT Minister Ashwini Vaishnaw, Parliamentary Affairs Minister Pralhad Joshi, and others arrive at the Parliament for the union cabinet meeting ahead of the presenting of the #Budget pic.twitter.com/GtUEvt7gmo
— ANI (@ANI) February 1, 2022