स्वामी विवेकानंदांवरील साहित्य विक्री रथ जळगावात दाखल

 

२० फेब्रुवारीपर्यंत विविध ठिकाणी दिवसभर उपलब्ध

जळगाव – साहित्य, संगीत कला आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रांत विशेष रस असणारे तसेच पाश्चात्त्य आणि भारतीय धर्मांशी जोडले गेलेले व्यक्तिमत्त्व व युवकांचे प्रेरणास्थान स्व.स्वामी विवेकानंद यांच्या बद्दलचा साहित्य विक्री रथ जळगाव शहरात दाखल झाला आहे.

रामकृष्ण मिशनचे सर्व भक्त व रामकृष्ण मिशन मठ, पुणे यांच्या वतीने तसेच प्रा.डॉ.रमेश झोपे, श्रीकांत देशपांडे, श्रीधर इनामदार, प्रकाश गलवडे यांच्या अनमोल सहकार्यातून स्व.स्वामी विवेकानंदांवरील साहित्य विक्री रथ जळगाव शहरात दाखल झाला आहे.

 हा रथ रविवार, दि.२० फेब्रुवारी  पर्यंत दररोज सकाळी 9 ते रात्री 8.30 या वेळेत नियोजनाप्रमाणे ठरवून दिलेल्या शहरातील भागात उभा असणार आहे. त्यामुळे जळगावकरांना स्व.स्वामी विवेकानंदांवरील साहित्य खरेदीचा आनंद घेता येणार असल्याने या संधीचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे श्री रामकृष्ण मिशनच्या सर्व भक्त परिवारातर्फे कळविण्यात आले आहे.

जळगाव शहरात रथ उभा राहण्याची ठिकाणे अशी :
२,३,६ व १३ फेब्रुवारी: काव्यरत्नावली चौक, ४ फेब्रुवारी: मू. जे. महाविद्यालय परिसर व रामदास कॉलनी, ५ फेब्रुवारी: गांधी उद्यान, ७ व ८ फेब्रुवारी: स्टेडियमच्या बाजूला, ९ फेब्रुवारी: शिवतीर्थ मैदान, १० व ११ फेब्रुवारी: सागर पार्क, १२ फेब्रुवारी: नेहरू चौक, १४ व १५ फेब्रुवारी: नवजीवन मेगा मार्ट, मानराज पार्क, १६ व १७ फेब्रुवारी: बजरंग बोगदा, १८ व १९ फेब्रुवारी: एलआयसी ऑफिसजवळ, ख्वाजामियाँ चौक,२० फेब्रुवारी: डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय