यावल : येथील पंचायत समितीकडे सरपंच परिषदे कडून निवेदन देत तालुक्यातील ग्रामपंचायीतांना मातोश्री ग्राम समृद्धी शेत शिवार पाणंद रस्ते योजनाच्या आराखड्यात समावेश करावा अशी मागणी करण्यात आली आहे. सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी यांची भेट घेत निवेदन देण्यात आले आहे
येथील पंचायत समिती मध्ये गटविकास अधिकारी नेहा भोसले यांच्या कडे यावल तालुका सरपंच परिषद कडून संघटनेचे तालुकाध्यक्ष संदिप सोनवणे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की तालुक्यातील काही ग्रामपंचायतीत कायम ग्रामसेवक नाहीये परिणामी विविध विकास कामांचे नियोजन करण्यात अडचणी निर्माण होतात तेव्हा ग्रामपंचायतीत कायम स्वरूपी ग्रामसेवक द्यावे तसेच राज्य शासना कडून मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजना अंतर्गत सन २१/२२ च्या वार्षिक आराखड्यात यावल तालुक्यातील एकही गाव नाही तेव्हा या आराखड्यात तालुक्यातील गावांचा समावेश व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे. सदरील निवेदन देतांना सरपंच परिषदेचे अध्यक्ष तथा वढोदा सरपंच संदीप सोनवणे, वड्री सरपंच अजय भालेराव, मारूळ सरपंच सैय्यद असद सैय्यद जावेद, महिला अध्यक्ष अलका शिरीष चौधरी, कोरपावली सरपंच विलास अडकमोल, अजय बाविस्कर, समाधान कोळी, विकास सोळंके, समाधान पाटील, निलेश कोळी, प्रमोद सोनवणे, गोपाळ सोळंके, नवाज तडवी, मुक्तार पटेल, सुनील कोळी, प्रदीप कोळी, रामकृष्ण सोळंके, अरुण सोळंके, गोपाळ सोळंके, आधार सोळंके, उज्वला पाटील, वर्षा कोळी सह आदींची उपस्थिती होती.
Next Post