पंतप्रधान नरेंद्र मोदिंनी महाराष्ट्राची माफी मागावी – डॉ उल्हास पाटील
काँग्रेसची मागणी , जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
जळगाव – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्र कार व विशेष करून काँग्रेसवर केलेली टीका अनाठायी आहे. खरं तर कोरोनाच्या काळात काँग्रेसचे कार्य अतिशय मोलाचे असून पंतप्रधानांना याचा सोयिस्कर विसर पडलेला आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी ” अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हासदादा पाटील यांनी केली आहे
ळी ते म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्रावर विशेष करून काँग्रेसवर केलेली टीका अनाठायी आहे. खरं तर कोरोनाच्या काळात काँग्रेसचे कार्य अतिशय मोलाचे असून पंतप्रधानांना याचा सोयिस्कर विसर पडलेला आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी. याच बरोबर जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार म्हणाले कि, नरेंद्र मोदी यांनीं संसदेत देशाची दिसाभूल केली आहे. त्यांनी उत्तर प्रदेशची निवणूक समोर ठेऊन असे विधन केले असून त्यांनी महाराष्ट्राची माफी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संसेदत संपूर्ण भारतात महाराष्ट्र काँग्रेसमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असा आरोप केला. या वरून महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशवरुन संपूर्ण महाराष्ट्र्रात मोदींविरुद्ध निदर्शने करण्यात येत आहेत.
घोषणांनी दणाणले जिल्हाधीकारी कार्यालय
जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे जिल्हधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी माफी मागितलीच पाहिजे अश्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी उल्हास पाटील , जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार , योगेंद्रसिह पाटील, सुलोचना वाघ, सचिन सोमवंशी, न्यानेश्वर कोळी,नागराध्यक्ष श्याम तायडे, प्रदीप सोनावणे, मनोज चौधरी
कोविड काळात मोदी सरकारने जळगाव जिल्हात दिलेल्या ४३३ कोटी रुपयांपैकी १००-१५० कोटी रुपयांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि तात्कालिन जिल्हा शल्यचिकिसक नागोराव चौव्हाण यांनी गैरव्यवहार केला असल्याचा दावा चंद्रशेखर अत्तरदे यांनी केला. यासाठी त्यांचा पत्नी व जी प सदस्य माधुरी अत्तरदे या जिल्हाधिरकारी कार्यालयासमोर उपोषणाला देखील बसल्या आहेत.
जनशक्तीशी बोलताना अत्तरदे म्हणाले कि, पालकमंत्री गुलराव पाटील यांच्या सांगण्या वरून तात्कालिन जिल्हा शल्यचिकिसक नागोराव चौव्हाण यांनी कोणत्याही ऑडिट शिवाय कित्येक वैद्यकीय वस्तूंची खरेदी केली. अशा तरेने त्यांनी शेकडो कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला असून यासर्वांचे कागदपत्रे आमच्याकडे आहेत.
गेल्या काही महिन्यांपूवी माहिती अधिकार कार्यकर्ते भोळे यांनी व्हेंटिलेटर घोटाळ्याप्रकरणी तात्कालिन जिल्हा शल्यचिकिसक नागोराव चौव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ज्याच्या प्राणीमान स्वरूपी चौव्हाण यांची बदली करण्यात अली अशी जनमानसात चर्चा आहे.आता अत्तरदे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर आरोप केले आहेत. यामुळे आता या प्रकरणाचे पुढे काय होते. हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.