कोविड काळात मोदी सरकारने जळगाव जिल्हात दिलेल्या ४३३ कोटी रुपयांपैकी १००-१५० कोटी रुपयांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि तात्कालिन जिल्हा शल्यचिकिसक नागोराव चौव्हाण यांनी गैरव्यवहार केला असल्याचा दावा चंद्रशेखर अत्तरदे यांनी केला. यासाठी त्यांचा पत्नी व जी प सदस्य माधुरी अत्तरदे या जिल्हाधिरकारी कार्यालयासमोर उपोषणाला देखील बसल्या आहेत.
जनशक्तीशी बोलताना अत्तरदे म्हणाले कि, पालकमंत्री गुलराव पाटील यांच्या सांगण्या वरून तात्कालिन जिल्हा शल्यचिकिसक नागोराव चौव्हाण यांनी कोणत्याही ऑडिट शिवाय कित्येक वैद्यकीय वस्तूंची खरेदी केली. अशा तरेने त्यांनी शेकडो कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला असून यासर्वांचे कागदपत्रे आमच्याकडे आहेत.
गेल्या काही महिन्यांपूवी माहिती अधिकार कार्यकर्ते भोळे यांनी व्हेंटिलेटर घोटाळ्याप्रकरणी तात्कालिन जिल्हा शल्यचिकिसक नागोराव चौव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ज्याच्या प्राणीमान स्वरूपी चौव्हाण यांची बदली करण्यात अली अशी जनमानसात चर्चा आहे.आता अत्तरदे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर आरोप केले आहेत. यामुळे आता या प्रकरणाचे पुढे काय होते. हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.