महत्वपूर्ण बातमी ! डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केट मनपाचे ‘नेक्ट टार्गेट’

 

जळगाव – मनपा प्रशासनाकडून गुरुवारी अक्खे भोईटे मार्केट सील करण्यात आले यावेळी तब्बल २४ गाळे सील करण्यात आले. मनपाकडून थकीत भाडे असलेल्या गाळेधारकांवर करण्यात आलेली हि सर्वात मोठी कारवाई आहे.आता  भोईटे मार्केटप्रमाणेच मनपा प्रशासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केटमधील गाळेधारकांनाही नुतनीकरणासाठी १० फेब्रुवारीपर्यंत आपले प्रस्ताव सादर करण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, या मार्केटमधील एकाही गाळेधारकाने मनपाकडे प्रस्ताव सादर न केल्याने या मार्केटमध्ये देखील आता मनपाकडून लवकरच कारवाई होणार असल्याची शक्यता आहे.आंबेडकर मार्केटमध्ये एकूण ६८ थकीत भाडे असलेले गाळेधारक आहेत. ज्यांच्याकडे ४-५ कोटी रुपये थकबाकी आहे.