जळगाव – महापालिकेमुळे येणाऱ्या कोणत्याही अडचणींमुळे आम्ही या दोन्ही पुलाचे काम थांबवणार नाही असा इशारा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे. पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचे व आसोदा रेल्वे गेटच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. पर्यायी रस्त्यासाठी मनपा प्रशासनाने आपल्या स्तरावर कामे मार्गी लावावीत, रेल्वे मात्र आपल्या वेळेवर या पुलाचे काम सुरु करणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाला सांगितले आहे.
आसोदा रेल्वे गेटवर उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरु होणार असून, याठिकाणचे रेल्वेगेट देखील बंद करण्यात येईल. त्यामुळे मनपाने आसोदेकरांना शहरात येण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा, त्याठिकाणी रेल्वे हा रस्ता तयार करून देईल असाही प्रस्ताव रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी महापौरांकडे ठेवला आहे.