जळगाव | गेल्या वर्षभरापासून या पक्षातून त्या पक्षात माकड उड्या मरण्याचा नगरसेवकांचा खेळ अजूनही सुरूच आहे. गुरुवारी भाजपातील ४ नगरसेवकांनी भाजपातून शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला.यात प्रवीण कोल्हे, प्रिया जोहरे, मीनाक्षी पाटील, मीना सपकाळेया चार नागरसेकांचा समावेश आहे.
जळगाव महापालिकेतील भाजपच्या ३० नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र दहा नगरसेवक स्वगृही परतले होते. दरम्यान, सभागृह नेते ललित कोल्हे, विरोधीपक्ष नेते सुनिल महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या गळाला भाजपमध्ये गेलेले चार नगरसेवक लागले असून पुन्हा त्यांनी शिवसेनेत दाखल झाले आहे. चारही नगरसेवकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश करुन शिवबंधन बांधले.
जळगाव महापालिकेच्या २०१८ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ५७ नगरसेवकांच्या जोरावर भाजपने महानगरपालिकेत झेंडा गडाला होता. मात्र अडीच वर्षातच अंतर्गत गटबाजीचा भाजपला ङ्गटका बसल्याने ५७ पैकी सुरुवातीला २७ आणि त्यानंतर ३ असे एकूण ३० नगरसेवकांनी बंडखोरी करीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे भाजपची बहुमातात असलेली सत्ता शिवसेनेने खेचून आणत महापालिकेवर भगवा फडवला.
काही महिन्यांपुर्वी प्रभागातील विकासकामे आणि विकासाच्या निधीवरुन शिवसेनेवर नाराज झालेले दहा नगरसेवक स्वगृही अर्थात भाजपमध्ये परतले होते. त्यामुळे शिवसेनेची सत्ता असली तरी पक्षीय बलाबलनुसार भाजपची संख्या जास्त असल्याने शिवसेनेची कोंडी होणार होती. मात्र सभागृह नेते ललित कोल्हे, विरोधीपक्ष नेते सुनिल महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी रणनीती आखत भाजपचे चार नगरसेवक आपल्या गळाला लावले. दरम्यान, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत नगरसेवक प्रविण कोल्हे, नगरसेविका प्रिया जोहरे, मिनाक्षी पाटील आणि मीना सपकाळे यांनी शिवसेनेत प्रवेश करुन शिवबंधन बांधले.
गुंतागुंत
२०१८ सालच्या सार्वत्रिक निवडणुकित भाजपचे ५७ नगरसेवक निवडून आले होते. तर शिवसेनेचे १५ नगरसेवक निवडून आले होते. जुलै २०२१ मध्ये भाजपातील ३० नगरसेवकांनी बंडखोरी केली व शिवसेने सोबत सत्ता बनवली. ऑक्टोबर २०२१ मध्ये यातील भांडा१० नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये गेले. शुक्रवारी या गेलेल्या १० बंडखोरांपैकी ४ नगरसेवक पुन्हा शिवेसनेत आले. संख्या बाळानुसार या घडीला शिवेसनेकडे ४० तर भाजपाकडे ३५ नगरसेवकांचे पाठबळ आहे.