जळगाव – वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या १५० वाहनधारकांवर शनिवारी शहर वाहतूक शाखेच्यावतीने कारवाई करण्यात आली. यावेळी त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. शहरातील आकाशवाणी चौक, शिवाजी चौक, टॉवर चौक अश्या विविध ठिकाणी हि कारवाई करण्यात आली.
वाहनधारकांना शिस्त लागावी म्हणून शहर वाहतूक शाखेच्यावतीने कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरातील विविध चौकांसह महामार्गावर ही मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेत विना परवाना, विना हेल्मेट, मास्क न वापरणे, दारू पिऊन गाडी चालविणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. केवळ दंड वसूल करणे हा आमचा उद्देश नसून वाहनधारकांना शिस्त लागावी, यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांनी सांगितले
१५० वाहनावर कारवाई
जळगाव शहरातील नागरिकांना वाहन चालवताना लागणारी शिस्त नाही हि वस्तूस्थिती आहे. यामुळे सर्रासपणे वाहनचालक वाहन चालवतात. अश्या वेळेस १५० वाहनांवर हि कारवाई करण्यात आली. यामुळे नागरिकांना शिस्त लागणार आहे.