आज माहसभा

 

जळगाव- स्वच्छ भारत अभियानार्ंतगत महापालिकेच्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी सुधारीत मान्यतेनुसार वाढीव खर्च १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून खर्च करण्यास मान्यतेसाठी दि. १४ रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन महासभा होणार आहे.

मनपाची महासभा महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. मनपाच्या ट्रॅक्टरवर दैनंदिन काम करण्यासाठी २४ मजूर १ वर्षाच्या कालावधीसाठी मक्तेदाराकडून घेणे, मनपा हद्दीत लावण्यात येणार्‍या जाहिराती, ङ्गलक यासाठी धोरण ठरविणे, भूमिगत केबल टाकण्यासाठी धोरण ठरवून दर निश्‍चितीस मान्यता देणे त्याचबरोबर घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी सुधारीत मान्यतेनुसार वाढीव खर्च १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून खर्च करण्यास मान्यता देणे. यासह २१ प्रशासकीय प्रस्तावांवर चर्चा केली जाणार आहे.