जळगावातील रेल्वे बोगद्याजवळ महिलेचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू

जळगाव : शहरातील खंडेरावनगर रेल्वे बोगद्याजवळ रेल्वेच्या धडकेत 35 वषीृय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना रविवार, 13 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

अनोळखी महिलेचा मृत्यू
आशाबाबा नगर रेल्वे बोगदा ते खंडेरावनगर रेल्वे बोगद्यादरम्यान रेल्वेरुळावर अनोळखी 35 ते 40 वर्षीय महिलेचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची माहिती रामानंदनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार हेड कॉन्स्टेबल अजित पाटील यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठून महिलेचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, अनोळखी 35 ते 40 वर्षीय महिलेने गडद निळ्या रंगाचा टॉप, त्यावर सफेद रंगाची बारीक डिझाइन सफेद रंगाची लॅगीज पँट परीधान केली असून ओळख पटत असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.