जळगाव ः जळगाव तालुका पोलिस ठाणे हद्दीतील भोलाणे शिवारातील नदी पात्राजवळ आकाश पुरूषोत्तम कोळी याने गावठी हातभट्टी दारू गाळण्याची भट्टी सुरू केल्याची माहिती जळगाव तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाल्यानंतर पथकाने धाव घेत कारवाई केली. यावेळी नवसागर मिश्रीत कच्चे-पक्के असे एक हजार लिटर रसायनासह तयार दारू मिळून 22 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. दरम्यान, भोलाणे तापी पात्राजवळ रातीलाल हरी कोळी हादेखील 800 लिटर कच्चे रसायनासह तयार दारूसह 14 हजारांचा मुद्देमाल बाळगताना पकडण्यात आले. या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले.
यांनी केली कारवाई
सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलिस उपनिरीक्षक कल्याण कासार, एएसआय माणिक सपकाळे, हवालदार साहेबराव पाटील, विलास शिंदे, ज्ञानेश्वर कोळी, जयेंद्र पाटील, नाना मोरे आदींच्या पथकाने केली.