अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर खडके येथे जप्त

एरंडोल : तालुक्यातील खडके बुद्रुक गावाजवळ चोरटी वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर एरंडोल पोलिसांनी जप्त केले आहे. याबाबत एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अवैध वाळू ऐरणीवर
एरंडोल तालुक्यातील खडके बुद्रुक गावाजवळ विना नंबरच्या ट्रॅक्टर व ट्रॉलीमध्ये बेकायदेशीररीत्या वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती एरंडोल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने शनिवार, 12 फेब्रुवारी रोजी रात्री 11.30 वाजता धडक कारवाई करत ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केले. दरम्यान, पोलिसांना पाहून ट्रॅक्टर चालक हा ट्रॅक्टर व ट्रॉली जागीच सोडून पसार झाला आहे. एरंडोल पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर जमा करण्यात आले. पोलिस कॉन्स्टेबल पंकज पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ट्रॅक्टरचालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल काशीनाथ पाटील करीत आहे.