के.सी.ई अंतर्गत येणाऱ्या आय.एम.आर कॉलेजमध्ये करीयर मार्गदर्शन,करीयर परामर्श आणि करीमर मेला आय एम.आर, नेहरू युवा केंद्र, जळगाव,जिल्हा प्रसासन यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात आयोजित करण्यात आला होता. .यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, नेहरू युवा केंद्राचे महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे संचालक प्रकाश कुमार मनोरे, मिलन राणा, एच आर मॅनेजर, रेमंड, आणि मनोज गोविंदवार उपस्थित होते
यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले कि, करीयर तुमच्या चाॅईसप्रमाणे ठरवा.कुणाच्याही इंन्फुईंन्सने ठरवू नका. सगळेच जातात त्या मार्गाने ना जाता तुमचा मार्ग निवडा.स्पर्धा परीक्षा पास झाल्यात तर रेडीमेड स्टक्चर मिळते.पण त्यापलिकडेही करीयर असते. स्वत:ची तुलना कुणाशीही करु नाका. करीयर करतांना मेंटल सपोर्ट फॅमिलीचा फार आवश्यक असतो. आता फ्युईडीटी आली आहे.मेडीकल ग्रॅज्युएशन नंतर मॅनेजमेंट करणारेही आहेत. कुणी सिव्हिल सर्व्हिस मध्येही जातात. पण जे ठरवाल ते काम नीट होईल, वेळ प्रसंगी प्लॅन बी तयार ठेवा.जेणेकरुन करीयर व्यवस्थित सेटल करा. युपीएससी करतांना बॅक अप तयार हवा. नाही जमले तर प्लॅन बी तयार असेल मग त्रास होत नाही. हॅल्यू एडीशन करत रहा .त्याचा फायदा नक्कीच मिळतो. उद्योजकांची रिस्क घ्या, तुमच्या विद्यापिठाच्या इनोव्हेशन सेंटरची मदत घ्या.या चार टिप म्हणुन लक्षात ठेवा, रिस्क घ्या वेगळा विचार करा. स्वत: करीयर निवडा करीयरच्या फ्युईडिटीचा योग्य उपयोग करा करीयल बॅक अप ठेऊन प्लॅन करा. शेवटी आम्ही गाईड करु शकतो. निर्णय तुमचा असेल. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रणिलसिंग चौधरी याने केले तर आभार प्रा डॉ शमा सराफ यांनी मानलें.