भुसावळ/जळगाव : चाळीसगाव रेल्वे स्थानकानजीक चार वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना घडली होती. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचे न्यायालयात कामकाज चालल्यानंतर न्यायालयाने आरोपी सावळाराम भानुदास शिंदे (27, मानसिंगका कॉलनी, पाचोरा, मूळ रा.लोंढरे, ता.नांदगाव) यास आजन्म (मरेपर्यंत) कारावास व 75 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
नोव्हेंबर महिन्यात घडली होती घटना
27 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री नऊ ते दहा वाजेदरम्यान आरोपीने चार वर्षीय बालिकेस बिस्कीट पुडा देण्याच्या आमिषाने नेत तिच्यावर अत्याचार केला होता. पीडीते बालिकेच्या आईने या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात 28 रोजी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी सावळाराम शिंदे यास तत्काळ अटक करण्यात आली होती. प्राथमीक तपास सहा.पोलिस निरीक्षक विशाल टकले यांनी केला.
17 दिवसात गुन्ह्याचा तपास पूर्ण
जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे यांच्याकडे वर्ग केला. डी.एन.ए.अहवाल प्राप्त झाल्यानंतर 17 दिवसात तपास पूर्ण करून विशेष न्यायालयाच्या न्या.एस.एन.माने यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. जलदगतीने या खटल्याचे कामकाज चालल्यानंतर 16 रोजी न्यायालयान आरोपी सावळाराम भानुदास शिंदे यास आजन्म कारावासासह आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली.
यांचे तपासकामी सहकार्य
पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाधिकारी पोलिस उपअधीक्षक कैलास गावडे, सहा. निरीक्षक विशाल, राकेश पाटील, राहुल सोनवणे, विमल सानप, सबा शेख यांनी यशस्वी तपास केला. कामकाजात पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांचे मार्गदर्शनाखाली दिलीप सत्रे यांनी मदत केली. जिल्हा सरकारी वकील अॅड.केतन ढाके यांनी युक्तीवाद केला. दरम्यान, तपास अधिकार्यांसह या प्रक्रियेत सहकार्य करणार्या अधिकार्यांचा बुधवारी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सत्कार केला.