जळगाव – राज्य शासनाकडून मनपाला सप्टेंबर महिन्यात उड्डाण पदोन्नत्ती घेऊन मनपात अधिकारी झालेल्या कर्मचाऱ्यांचा मूळ पदावर करण्यात यावे किंवा संबंधित अधिकाऱ्याच्या वेतनात शास्ती लावण्यात यावी असे आदेश दिले होते. मात्र अजून मनपा तर्फे या बाबद कोणतीही कारवाई केली असनू या बाबद मनपा प्रशासन कारवाई करण्यास उदासीन भूमिका घेत आहे.
२१ सप्टेंबर २०२१ राजी राज्य शासनाने मनपाला पात्र लिहिले होते ज्यात त्यांनी नमूद केले होते कि, तत्कालीन मुख्य अधिकाऱ्यांवर याप्रकरणी कारवाई करणे कठीण आहे. सद्यस्थितीत उड्डाण पदोन्नत्ती घेऊन मनपात अधिकारी झालेल्या कर्मचाऱ्यांचा मूळ पदावर करण्यात यावे किंवा संबंधित अधिकाऱ्याच्या वेतनात शास्ती लावण्यात यावी. जे सेवानिवृत्त झाले आहेत अशा कर्मचाऱ्यांची यादी शासनाकडे त्वरित जमा करण्याची सूचना मनपा प्रशासनाला दिली आहे.
हे कर्मचारी थेट झाले अधिकारी
अरविंद भोसले आधी मजूर होते व नंतर उपआवेक्षक झाले.
इस्माईल अब्दुल आधी मजूर होते मग सर्वेअर झाले.
संजय नेवे आधी मजूर होते मग बिल्डींग इंस्पेक्टर झाले.
गोपाळ लुले हरी मजूर होते मग सर्वेअर झाले.
जितेंद्र यादव आधी मजूर होते मग बिल्डींग इंस्पेक्टर झाले.
संजय नेमाडे आधी माळी होते मग बिल्डींग इंस्पेक्टर झाले.
मंजूर खान आधी मजूर होते मग बिल्डिंग इन्स्पेक्टर झाले.
सुनील भोळे आदी मजूर होते मग कनिष्ठ अभियंता झाले.
विलास सोनावनी पहिले मजूर होते नंतर कनिष्ठ अभियंता झाले.
चंद्रकांत वांद्रे आधी वाचमेन होते मग क्लोरीन ऑपरेटर झाले.
राम रावलानी आणि अधिक कुली होते मग मिश्रक झाले.
राजेंद्र पाटील आधी माळी होते मग आरोग्य निरीक्षक झाले.
फिरोज काझी आणि मजूर होते मग सर्वेयर झाले.
फिरोज काझी आधी मजूर होते मग सर्वेअर झाले.
अकबर पिंजारी यादी मंजूर होते मग उद्यान अधीक्षक झाले.
शिवलाल पाटील आधी माळी होते मग मोटार चालक झाले.
राजेंद्र वाघ आधी माळी होते मग मोटारचालक झाले.
अकबर सय्यद अली माळी होते मग मोटार चालक झाले.
रमेश तांबट आधी माळी होते मग मोटार चालक झाले.
सुरेश कोळी आधी माळी होते मग मोटार चालक झाले.
संजय पाटील आधी मजूर होते मग बिल्डींग इंस्पेक्टर झाले.
विलास सूर्वे आधी मंजूर होते मग इलेक्ट्रिक ओव्हर सिजर झाले.
विलास पाटील आधी मजूर होते मग इलेक्ट्रिशियन झाले.