धुळे : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे, जिल्हा आदिवासी उपयोजनेंतर्गत प्रकल्पस्तरीय आश्रमशाळांच्या क्रीडा स्पर्धां 2021- 22 चे 18 व 19 फेब्रुवारी 2022 रोजी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, रोहोड, ता. साक्री, जि. धुळे येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये विविध क्रीडा प्रकारात 1400 विद्यार्थी सहभागी होतील. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ही माहिती दिली आहे.
शुक्रवार 18 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी दहा वाजता या स्पर्धांचे उदघाटन होईल. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, खार जमीन विकास, बंदरे व विशेष साहाय्य विभागाचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उदघाटन होईल. आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे प्रमुख अतिथी असतील. खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार डॉ. हीनाताई गावित, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, आमदार अमरिशभाई पटेल, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार किशोर दराडे, आमदार जयकुमार रावल, आमदार काशिराम पावरा, आमदार कुणाल पाटील, आमदार मंजुळाताई गावित, आमदार डॉ. फारुक शाह, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव, आदिवासी विकास विभागाच्या नाशिक विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त संदीप गोलाईत, साक्री पंचायत समितीच्या सभापती प्रतिभाताई सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य विश्वास बागूल, रोहोडचे सरपंच हिम्मत साबळे प्रमुख मान्यवर असतील.
दोन दिवस सुरू राहणाऱ्या या स्पर्धांमध्ये धुळे प्रकल्पांतर्गत येणाऱ्या 23 शासकीय आणि 34 अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थी सहभागी होतील. या स्पर्धेसाठी 14, 17 आणि 19 वर्षे असे वयोगट असतील. वैयक्तिस्तरावर धावणे, लांब उडी, उंच उडी, थाळी फेक, गोळा फेक, तर सांघिक प्रकारात खो- खो, कबड्डी, व्हॉलिबॉल, हॅण्डबॉल या क्रीडा प्रकारात विद्यार्थी सहभागी होतील. या स्पर्धेपूर्वी गेल्या महिन्यात तालुकास्तरावर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांतून निवडण्यात आलेले खेळाडू या स्पर्धेत सहभागी होवून आपले कौशल्य दाखवतील. या स्पर्धेसाठी एकूण चार गट करण्यात आले आहेत. त्यात साक्री- अ, साक्री- ब, शिरपूर, धुळे व शिंदखेडा असे गट असतील. या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत. त्यासाठी विविध समित्यांचे गठन ही करण्यात आले आहे.
सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी श्रीमती धोडमिसे, प्रकल्पस्तरीय नियोजन समितीचे अध्यक्ष रमेश मोतीराम वसावे, सदस्य धीरज धनाजी अहिरे, महिला सदस्य लताबाई वसंत पवार, अत्तरसिंग समुद्रसिंग पावरा, ॲड. मनुवेल जे. वळवी, दीपक अहिरे, प्रवीण बापू चौरे हे संयोजन करतील.