जळगाव – शहरातील स्वच्छतेचा ठेका ‘वॉटरग्रेस’ एजन्सीला दिला असून घंटा गाडीमध्ये कचरा ऐवजी गाळ टाकला जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी मनपा प्रशासनाला दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मनपाने याबाबाद नवीन नियम बनवलेला असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले आहे. ज्यामध्ये कादम, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता निरीक्षक यांनी आपल्या भागातील निघालेला गटार गाळ वजनकाट्यावर पाठविण्यापूर्वी गटार गाळ प्रमाणित करुन वजन काट्यावर पाठवावा असे आदेश मनपा तर्फे देण्यात आले आहेत. यामुळे आता कचऱ्याच्या वाजतानात फेरफार करणाऱ्यांवर अंकुश बसणार आहे.
वॉटरग्रेस प्रॉडक्ट्स नाशिक यांना शहरातील साफ सफाई करिता कामगार पुरवठा करणे व कचरा संकलन करणेसाठी ५ वर्षांचा कालावधी करिता मक्ता देण्यात आला आहे. जळगाव शहरातील कचरा व गटार गाळ संकलन करून त्याचे वजन टी.बी.एस. येथील मनपा वजन काट्यावर करण्यात येते. मात्र मासिक वजनाचा अहवाल पाहता मोठ्या प्रमाणात गटार गाळ असल्याचे दिसुन येत आहे. यामुळे संबंधीत मोकादम, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता निरीक्षक यांनी आपले भागातील निघालेला गटार गाळ वजनकाट्यावर पाठविण्यापूर्वी गटार गाळ प्रमाणित करुन वजन काट्यावर पाठवावा असे आदेश मनपा तर्फे देण्यात आले आहेत. .
तसेच सदर गटार गाळ विषयी वाहनाचे मोकादम, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता निरीक्षक यांचेद्वारे प्रमाणित केलेले प्रमाणपत्र असल्यास काट्यावरील कर्मचारी यांनी सदर प्रमाणपत्र घेऊन सदर वाहनांचे वजन करावे व दिलेल्या प्रपत्रात प्रमाणित करुन प्रमाणित करावे. सदरचे गटार गाळ प्रमाणित केलेले प्रमाणपत्र नसल्यास सदर वाहनाचे वजन करण्यात येवू नये.
सदरचे वाहन वजनकाट्यावरुन निघाल्यानंतर घनकचरा प्रकल्प येथे डेपो मोकादम, डेपो स्वच्छता निरीक्षक यांनी स्वतः संपुर्ण वाहन खाली केलेले आहे किंवा नाही याची शहानिशा करावी व सदर प्रपत्रामध्ये प्रमाणित करून दैनंदिन अहवाल आरोग्य विभागास सादर करावा.असे आदेश मनपाने संबंधित ठेकेदारांना दिले असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले आहे.