नाफेडतर्फे चना खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू

धुळे, दि. 17 (जिमाका वृत्तसेवा) : खरीप हंगाम 2021- 22 मध्ये धुळे व नंदुरबार जिल्ह्यात नाफेडच्या वतीने चना खरेदी करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या आधारभूत दराने ही खरेदी करण्यासाठी येईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी एम. एस. सोनवणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

चनाचा आधारभूत दर प्रति क्विंटल पाच हजार 230 रुपये असेल. शेतकऱ्यांना पुढील ठिकाणी ऑनलाइन नोंदणी करता येईल. (अनुक्रमे नोंदणीचे ठिकाण व मोबाईल क्रमांक) : धुळे तालुका खरेदी- विक्री आणि प्रक्रिया सोसायटी, धुळे, 99758- 33707. शिरपूर तालुका सहकारी खरेदी- विक्री सोसायटी लि. शिरपूर, जि. धुळे, 94221- 23929, शिंदखेडा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. दोंडाईचा, ता. शिंदखेडा, जि. धुळे, 92844- 29877, शेतकरी सहकारी संघ लि. साक्री, ता. साक्री, जि. धुळे, 94218-85866, शेतकरी सहकारी संघ लि. नंदुरबार, जि. नंदुरबार, 97632-86860, शहादा तालुका सहकारी खरेदी- विक्री संघ लि. शहादा, जि. नंदुरबार, 77220- 14165.
नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2021- 22 मधील ऑनलाइन पीकपेरा नमूद असलेला सातबारा उताऱ्याची मूळ प्रत, आधारकार्ड, बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, मोबाईल क्रमांक आदींची माहिती वरील ठिकाणी नोंदवावी. शासनाचे खरेदी आदेश मिळाल्यावर शेतकऱ्यांना नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे शेतमाल घेवून येण्याचा दिनांक कळविण्यात येईल.