Ahmedabad Serial Blast News: गुजरात राज्यातील अहमदाबादमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषींपैकी ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए आर पटेल यांनी ४९ दोषींपैकी ३८ जणांना हि शिक्षा सुनावली आहे. तर इतर ११ जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यावेळी निर्णय देताना न्यायाधीश ए आर पटेल यांन निर्णय देताना सर्व ४९ आरोपींना दोषी ठरवलं होतं.
२६ जुलै २००८ रोजी अहमदाबादमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात ५६ लोकांचा मृत्यू झाला होता, तर २०० जण जखमी झाले होते. २६ जुलै २००८ ला झालेल्या २१ साखळी बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं.