2100 हून अधिक बालके ‘समतोल’मुळे स्वत:च्या घरी

जळगाव रेल्वे स्थानकावर बालसहायता केंद्राचे उद्घाटन

 

जळगाव (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारतीय रेल्वे प्रगतीपथावर असून त्याच आलेखाने केशवस्मृतीचे काम सुरु आहे. याच माध्यमातून समतोल प्रकल्पही काम करत आहे. 25 राज्यात सुमारे 2100 पेक्षा जास्त मुलांना आपल्या घरी पोहचविण्याचे कामही त्यांनी केले आहे. म्हणून समतोलचे कौतुक करावे तेवढे कमी असे आपल्या मनोगतात केंद्रीय प्रवासी उपभोक्ता समितीचे सदस्य डॉ.राजेंद्र फडके यांनी सांगितले. ते जळगाव रेल्वे स्थानकावर नव्याने उभारण्यात आलेल्या समतोल प्रकल्पाच्या बाल सहाय्य्यता केंन्द्राच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते.
जळगाव रेल्वे स्थानकावर प्लॅट फॉर्म क्र 3 येथे रेल्वे प्रशासनाच्या सहयोगाने समतोलच्या माध्यमातून बाल सहायता कक्ष उभारण्यात आला असून त्याचा उद्घाटन सोहळा शिवजयंतीच्या निमित्ताने पार पडला. डॉ फडके पुढ़े ते म्हणाले की, अशा चांगल्या कामांसाठी तुम्हाला ज्या-ज्या रेल्वे स्थानकावर समतोल प्रकल्पासाठी मदत हवी असल्यास मी सदैव तयार आहे असे म्हणत जळगाव-जालना-औरंगाबाद ट्रॅकचा प्रस्तावही मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. तर भुसावळहुन सुरुवात झाल्यावर जळगाव रेल्वे स्थानकावर नवीन कॅबिनचे असणे कौतुकाची बाब आहे. याठिकाणाहून अनेक बेवारस लहान मुलांना आपल्या माता-पित्यांपर्यंत पोहोचविले, आम्ही जिथे कोणीच काम करत नाही अशा ठिकाणी काम करतो, अजूनही कोणत्या विषयात काम करण्यासारखे राहिले असल्यास आम्हाला सुचवावे असे आपल्या मनोगतात केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतअमळकर म्हणाले.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे भुसावळ विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे संदीप कासार,स्टेशन प्रबंधक ए. एम अग्रवाल,भुसावळ आर.पी.एफ इन्स्पेक्टर दयानंद यादव,जळगाव जी.आर.पी पो.उ.नि राजेंद्र पाटील,सचिव रत्नाकर पाटील,समतोल प्रकल्प प्रमुख राहुल पवार यांचेसह डॉ.महेंद्र काबरा,डॉ.नितीन चौधरी,डॉ.राजेश डाबी, सह दिलीप चोपडा, मनिषा खडके, अनिता कांकरिया, नितीन चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर येवले यांनी केले तर यशस्वितेसाठी सपना श्रीवास्तव, प्रदीप पाटील, विश्वजित सपकाळे, महेंद्र चौधरी, दिपक पाचपांडे, योगानंद कोळी, प्रशांत चौधरी, गोपाल तगडपल्लेवार, किशोर गवळी यांनी परिश्रम घेतले.