भुसावळ : भुसावळात गावठी कट्टा विक्रीसाठी शस्त्र तस्कर आल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संशयीताच्या रविवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास मुसक्या आवळल्या. दीपसिंह गुरूमुखसिंह कलाणी (20, तितराण्या, हेलापटाव, जि.खरगोन, मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून चार गावठी कट्टे तसेच पाच जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंदक्रांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक हरीष भोये, एएसआय शरीफ काझी, हवालदार रमण सुरळकर, नाईक निलेश चौधरी, नाईक उमाकांत पाटील, शिपाई प्रशांत परदेशी, शिपाई योगेश माळी, शिपाई प्रशांत सोनार, शिपाई दिनेश कापडणे, कॉन्स्टेबल योगेश महाजन आदींच्या पथकाने ही कारवाई केली.