शिरपूर (प्रतिनिधी) येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या नगर परिषद, शिरपूर मर्चंट बॅन्क, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या तयारीला लागावे अशा प्रकारच्या सुचना भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी कार्यकर्त्यांना दिल्यात.
ते शिरपूर शहर व तालुका भाजपा तर्फे दि. २० फेब्रुवारी रोजी येथील भाजपा कार्यालयात आयोजित बैठक त्यांचा अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते. राज्यात सध्या निष्क्रिय प्रवृत्तीचे सरकार बसलेले असून सर्वसामान्य जनता शेतकरी कष्टकरी यांच्यावर सूड उगवत आहे. मात्र येणाऱ्या नगर परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये या सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली असून कार्यकर्त्यांनी यासाठी कंबर कसून कामाला लागावे तसेच मायक्रो डोनेशन प्रमुख, सुधरुढ बालिका-बालक स्पर्धा प्रमुख, शक्तीकेंद्र निहाय त्याच शक्तिकेंद्रामधे असणारा प्रभारी नेमणे, प्रत्येक शक्ती केंद्रनिहाय संयोजक नेमणे, गुरुवार दि. 24 फेब्रुवारी रोजी शक्तीकेंद्र बुथ कार्यकर्ता बैठक, रविवार दि. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा. मन की बात कार्यक्रमाच्या बरोबर व्यापक बूथ बैठकांचे आयोजन करावे. बूथ मधील प्रदेश पासुन बूथ कार्यकर्ते 100% उपस्थित राहतील याची व्यवस्था करावी असे हि आवाहन बबनराव चौधरी यांनी केले. कोविड काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जनसामान्यांची असुविधा होऊ नये यासाठी अन्नसुरक्षा योजने अंतर्गत गरिबांना मोफत धान्य उपलब्ध करून दिले त्यासोबत जनधन खात्यावर प्रत्येकी पाचशे रुपये उपलब्ध करून देत खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेला आधार दिला असे ते म्हणाले. येत्या नगर परिषद निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावत काम करण्याची गरज असून आपल्या जिद्दीच्या बळावर कृषी उत्पन्न बाजार समिती, शिरपूर मर्चंट बॅन्क तसेच नगर पालिकांच्या सर्वच जागा कश्या निवडून येतील यासाठी निर्धार करण्याचे धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील यांनी हि आपल्या भाषणात सांगितले.
यावेळी ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, पं. स. सदस्य चंद्रकांत पाटील, मा. जि. चिटणीस संजय आसापुरे, तालुका सरचिटणीस मंगेश भदाणे, जितेंद्र सुर्यवंशी, तालुका उपाध्यक्ष भास्कर बोरसे, भारत पावरा, तालुका चिटणीस सुनिल चौधरी, तालुका कार्यालय प्रमुख देवेंद्र देशमुख, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, रोहित शेटे, शहर उपाध्यक्ष मुकेश पाटील, शहर चिटणीस राधेश्याम भोई, भाजपा भटक्या विमुक्त आघाडी प्रदेश सदस्य रविंद्र भोई, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आकाश मराठे, शहराध्यक्ष विक्की चौधरी, शहर उपाध्यक्ष अनिल बोरसे, भुपेश परदेशी, प्रकाश गुरव, रफीक तेली, मन की बात तालुका संयोजक प्रमोद मराठे, सहसंयोजक अजिंक्य शिरसाठ, राज सिसोदिया, रविंद्र सोनार, पप्पु राजपुत, जयपाल राजपुत, पंकज पाटील, जगन्नाथ पाटील, कांतीलाल पावरा, हेमंत बोरसे, रविंद्र राजपुत, उज्जवल मराठे, सौ. सुरेखा गिरासे, गणेश माळी, प्रमोद पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आभार व सुत्रसंचालन तालुका सरचिटणीस मंगेश भदाणे यांनी केले.