जळगाव – आपले अजून मंत्री आत जातील याची महाविकास आघाडीला भीती आहे. म्हणून महाविकास आघाडी सरकार नवाब मलिक यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेत नाहीये अशी टीका आमदार राजूमामा भोळे यांनी केली.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार ईडीने अटक केलेल्या महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा यासाठी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर तर्फे मंगळवारी जळगाव शहराचे आमदार मा राजू मामा, यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विशाल त्रिपाठी ,नितीन इंगळे , अक्षय चौधरी , भूषण भोळे, रोशन वाहेली, दीपक साखरे, दीपमाळा काळे, रंजना सपकाळे, आदी उपस्थित होते.