बोदवड तालुक्यात झाडांना पेटविण्याच्या प्रमाणात वाढ

0

बोदवड । तालुक्यातील रस्त्याच्या दुतर्फा असलेली हिरवीगार झाडे पेटवून देत वनसंपदेचा र्‍हास सुरू आहे. मात्र, असे कृत्य करताना कोणतीही व्यक्ती आढळल्यास कठोर कारवाई करू, अशा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता के.पी.धांडे यांनी दिला आहे.

काही माथेफिरु मुद्दाम हिरव्यागार झाडांचे बुंधे पेटवून देतात. गेल्या आठवड्यात शनिराबाद-सुनसगाव रोड, बोदवड रस्ता, मलकापूर, जामठी रस्त्यावर अशी घटना घडलेल्या आहेत.

यानुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धांडे यांनी वनसंपदा, झाडे वाचवणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. शेतकरी बांधवांनी बांधावर साफसफाई करताना, गवत जाळताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन केले. तसेच गेल्या आठवड्यात साळशिंगी येथे दोन, जामठी तीन, तर राजूर येथे एक झाड पेटवून देण्यात आले होते. अशा कृत्यांमध्ये भविष्यात कारवाई करू, असे सांगितले. तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांचीही उपस्थिती होती.